भक्ती शक्ती संगम २०२५ – संपूर्ण माहिती
🚩 वारकरी-धारकरी संगमाचे प्रतीक – 'भक्ती शक्ती संगम'

संतपाऊले साजिरी । गंगा आली आम्हावरी । जें उडे रजधुळी ।
तेथें सर्व आंघोळी ॥ . श्री तुळजाभवानी प्रसन्न ।।
वारकरी धारकरी संगम म्हणजेच भक्तीगंगा शक्तीगंगा संगम
आदरणीय श्री. रा. रा. सप्रेम नमस्कार विनंती विशेष
महाराष्ट्रांतील सर्व वारकरी बंधू, आळंदी, देहूतून निघून श्रीज्ञानोबांच्या व श्रीतुकोबांच्या पालख्या घेऊन, पुण्यामध्ये प्रतिवर्षी जेष्ठ वद्य नवमीला मुक्कामासाठीं येत असतात. जेष्ठ वद्य एकादशी दिवर्शी पहाटे पंढरपूरच्या दिशेनें प्रस्थान करतात.
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजीमहाराज, हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेचे कार्य यशस्वी व्हावें म्हणून संतांच्या दर्शनाला जावून, त्यांचे आशीर्वाद घेत असत. ही त्यांची पध्दती आम्ही हि अनुसरण्यासाठी, वारकरी धारकरी संगम म्हणजेच भक्तीगंगा शक्तीगंगा संगम या उदात्त कार्यक्रमाच्या माध्यमांतून, दरवर्षी करीत आहोत.
यावर्षी जेष्ठ कृष्ण नवमी शुक्रवार दिनांक २० जून२०२५, या दिवशीं, महाराष्ट्रांतील सर्व जिल्ह्यांतील, सर्व शिवपाईकांनी, शिवभक्तांनी व धारकऱ्यांनी आपापल्या गांवातून निघून पुण्यांत, जंगली महाराज रस्त्यावरील श्री जंगली महाराज मंदीरात दुपारी १२ वाजेपर्यंत जमावे.
आपले नम्र, श्री. रावसाहेब देसाई अध्यक्ष श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
।। राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळ ।।
आपल्या गांवापासूनचे पुण्यापर्यंतचे अंतर लक्षात घेऊन शुक्रवार दिनांक २० जून २०२५, दिवशीं, दुपारी १२.०० चे आत पुण्याला पोहोचण्यासाठी आपल्या प्रवासास प्रारंभ करावा.
आपण दुपारी ०२.०० वाजता मंदिरातून निघून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे दर्शन घेऊन, पालखी मार्गावरून येऊन ०४.०० वाजेपर्यंत नेहमीच्याच ठिकाणी येऊन थांबणार आहोत.
येताना प्रत्येकानें डोक्यावर पांढऱ्या रंगाची टोपी घालूनच निघावे व कार्यक्रमांत सहभागी होताना
डोक्यावर बांधण्यासाठीं भगवा फेटा स्वतःबरोबर आणावाच.
या कार्यक्रमास येणाऱ्या प्रत्येकाने भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे.
- श्रीशिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थान
🔸 भक्ती शक्ती संगम म्हणजे काय?
भक्ती शक्ती संगम हा वारकरी आणि धारकरी यांचा ऐतिहासिक संगम आहे. याची पार्श्वभूमी इतिहासात खोलवर रुजलेली आहे :
-
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूर वारीसाठी आळंदी आणि देहूपासून निघते.
-
मुघल आक्रमणकाळात वारकऱ्यांवर सतत हल्ले होत असत.
-
हाच अन्याय पाहून छत्रपती संभाजी महाराज स्वतः वारीच्या मार्गावर संरक्षणासाठी उपस्थित राहिले.
-
त्यानंतर वर्षानुवर्षे धारकरी म्हणजेच मराठा सैनिक वारकऱ्यांच्या रक्षणासाठी दिंडीत सहभागी होऊ लागले.
-
हाच ऐतिहासिक परंपरेचा वारसा "भक्ती शक्ती संगम" म्हणून ओळखला जातो.
🔸 आजच्या काळात ही परंपरा कोण चालवतं ?
प्रत्येक वर्षी पुण्यातील जंगली महाराज मंदिर, येथे संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमनप्रसंगी श्री. शिवप्रतिष्ठानचे शेकडो धारकरी पारंपरिक पोशाखात स्वागतासाठी उभे राहतात – यालाच "भक्ती शक्ती संगम" असे म्हटले जाते.
🗓 भक्ती शक्ती संगम – २०२५
📅 दिनांक: २० जून २०२५
वार : शुक्रवार
🕘 वेळ : सकाळी ९:०० पासून
📍 ठिकाण : जंगली महाराज मंदिर, पुणे
🔸 कार्यक्रम वैशिष्ट्ये:
-
संतांची पालखी पुण्यात आगमन
-
धारकऱ्यांचे पारंपरिक शस्त्रधारण करत स्वागत
-
इतिहास, परंपरा, आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम
-
भगव्या झेंड्यांचा उत्साह आणि हरिनाम संकीर्तन
भक्ती शक्ति माहिती पत्रक
🙏 कोण सहभागी होऊ शकतो?
-
सर्व वारकरी, शिवप्रेमी, धर्मप्रेमी, तरुण मंडळी
-
पारंपरिक पोशाख (सफेद धोतर, पगडी / भगवा पोशाख) घालून सहभागी व्हावे
💬 अधिक माहिती व सहभागासाठी संपर्क करा :
🚩 ही केवळ परंपरा नाही, हे आहे हिंदवी स्वाभिमानाचे प्रतीक!
🚩 भक्तीची गंगा आणि शक्तीचा सिंहगर्जना यांचा संगम म्हणजे – भक्ती शक्ती संगम!
भक्ती शक्ति मध्ये मार्गदर्शन करताना श्री. संभाजी भिडे गुरुजी
आतां चालणें चालणें हाच मार्ग।
आम्हा वाटतों मायभू हाच स्वर्ग।।
कधीं ना कशाची आम्ही आस केली।
ह्रदयीं आमच्या राष्ट्रनिष्ठा उदेली।।
भक्ती शक्तिमध्ये सहभागी धारकरी
हर हर महादेव!
जयतु हिंदुराष्ट्रम्!
तुकाराम महाराज की जय!
संत ज्ञानेश्वर महाराज की जय!
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH